सोमवार, डिसेंबर 11, 2023

ज्यांनी ‘मनपा’ मध्ये शिवसेनेची सत्ता आणली तेच ज्येष्ठ शिवसैनिक शिंदे गटात !

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२३ । जळगाव जिल्ह्यात पाच आमदार शिवसेनेत गेल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. मात्र आता विलास पारकर जे शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख आहेत. ते देखील शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटाला अतिशय मोठा धक्का बसला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ज्येष्ठ शिवसैनिक शिशिर शिंदे यांनी ठाकरे गटाला नुकताच ‘जय महाराष्ट्र’ केला होता. यांचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला. याचबरोबर शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख असलेले विलास पारकर यांचाही शिवसेनेत प्रवेश झाला आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये जे अभूतपूर्व राजकीय बंड झालं ते विलास पारकर यांच्या मध्यस्थीनेच होऊ शकलं होतं. यामुळे जळगावच्या राजकारणावर किंबहुना जळगावतील शिवसेनेच्या राजकारणावर विलास पारकर यांचा मोठा प्रभाव आहे. विलास पारकर यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच तेव्हा कुलभूषण पाटील हे उपमहापौर झाले तर जयश्री महाजन या महापौर झाल्या होत्या.

आज प्रवेशानंतर विलास पारकर यांनी मनपा मधील त्या सत्तांतरांची गोष्ट सांगितली. यावेळी त्यांनी कशाप्रकारे एकनाथ शिंदे यांनी त्यांना समर्थन दिलं याची संपूर्ण माहिती दिली.