ना.गुलाबराव पाटलांनी दिला आदित्य ठाकरेंना सल्ला.. नेमका आहे तरी काय?

फेब्रुवारी 23, 2023 12:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२३ । माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटावर सातत्याने निशाणा साधत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांचा गद्दार असा उल्लेख करत आहे. मात्र अशातच शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil ) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार करत एक सल्ला दिला आहे.

gulabrao patil adity thakre 1 jpg webp

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?

गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत असताना सात महिने झाले एकच पिक्चर सुरू आहे. लोक आता बोअर झाली आहे, काहीतरी वेगळं करा म्हणून आदित्य ठाकरे यांना डिवचलंय. तसेच आदित्य ठाकरेंना सल्ला देखील दिला आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले, आत्ता जो पक्ष राहिला आहे, त्या पक्षाला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करा, निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करा असा सल्ला दिला आहे.याशिवाय एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होऊन 210 दहा दिवस झाले आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपाला अर्थ नाही आणि आदित्य ठाकरे जर असे बोलत असतील तर त्याबाबत माहिती नाही म्हणत बंडखोरीवर गुलाबराव पाटील यांनी बोलणं टाळलं आहे.

आदित्य ठाकरे यांना जे मिळालं आहे त्यातून पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि आम्हाला चितपट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. शेवटी निवडून येण्याला महत्व आहे असेही गुलाबराव पाटील म्हणाले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now