⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | प्रवाशांना मोठा दिलासा! भुसावळून धावणाऱ्या मेमू गाड्यांना आता 8 ऐवजी 12 डबे

प्रवाशांना मोठा दिलासा! भुसावळून धावणाऱ्या मेमू गाड्यांना आता 8 ऐवजी 12 डबे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२३ । मेमू गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होत असल्याने अनेकदा बसण्यासाठी दूरच उभे राहण्यासाठी जागा नसते. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. प्रवाशांकडून मेमू गाड्यांच्या डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली जात होती. अखेर रेल्वे प्रशासनाने आता प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मेमू गाड्यांना आठ ऐवजी १२ डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून म्हणेजच १ जुलै पासून मेमू १२ डबे घेऊन धावेल. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या गाड्यांना अतिरिक्त डब्बे
चाळीसगाव-धुळे मेमूला पूर्वी सात डबे होते. मात्र ती आता आठ डबे घेवून १ जुलैपासून धावणार आहे. भुसावळ देवळाली ही संध्याकाळी सुटणारी आठ डब्यांची मेमू गाडी आता १० जुलैपासून १२ डबे घेऊन धावेत तर देवळाली-भुसावळ या मेमूला ११ जुलैपासून १२ डबे जोडण्यात येतील.

भुसावळ-वर्धा मेमूला देखील आठऐवजी आता १२ डबे जोडण्यात येतील. ती ११ जुलैपासून धावणार आहे. वर्धा-भुसावळ मेनू ही गाडी १२ जुलैपासून १२ डब्यांसह धावेल. तसेच वर्धा बल्लारशाह ही मेमू गाडी १२ जुलैपासून १२ डबे घेऊन चालेल. बल्लारशाह वर्धा मेमू ही गाडी १२ जुलैपासून १२ डबे घेवून धावणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.