जळगावात अपघाताची मालिका थांबेना! आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार..

मे 26, 2023 2:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२३ । जळगाव जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत असून रोज एक दोन तरी अपघात होत असून काहींचा जीव जात आहे. अशातच आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू आल्याची घटना आज शुक्रवारी धरणगाव तालुक्यातील पिंप्री नजीक घडलीय. गजानन पाटील(४३) असं मृत तरुणाचं नाव असल्याचं समजतेय.

pimpri apghat jpg webp

धरणगाव तालुक्यातील पिंप्री जवळ मुख्य रस्त्यावर दुचाकीस्वार तरुणाला आयशर (क्र. एम.एच.१८.बी.झेड.०६२२) ने दुचाकीला दोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उद्धव ढमाडे यांच्यासह खुशाल पाटील, दीपक पाटील, समाधान भागवत यांच्यासह कर्मचारीसह भेट देत आयशर पोलीस स्थानकात जमा केली होती.

हा तरुण धरणगाव तालुक्यातील वाघळूद गावातील गजानन पाटील(४३) असल्याचे देखील समजते. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now