भरधाव पिकअपवरील ताबा सुटला अन् मंदिराजवळ असलेल्या चौघांना.. पाचोऱ्यातील धक्कादायक घटना

मे 12, 2023 11:18 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२३ । पाचोरा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. भरधाव पिकअपवरील ताबा सुटल्याने मंदिरासमोर बसलेल्या चौघांना जोरदार धडक बसली. या धडकेत चौघांपैकी दोघांचे पाय गुडघ्यापासुन निकामी झाले. तर दोन जण किरकोळ जखमी झाले असून जखमींना पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पिकअपच्या ड्रायव्हर व क्लिनरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तक्रार नोंदविण्याचे काम सुरू आहे.

pachora 1 jpg webp

नेमकी काय आहे घटना?
पाचोरा शहरातील महाराणा प्रताप चौकातील ही घटना असून आज शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास भडगावच्या दिशेकडून बुलढाण्याकडे (एम.एच. बी.एम. ७९४३) ही पिकअप भरधाव वेगाने जात होती. मात्र याच दरम्यान, वाहन चालकाचा पिकअपवरील ताबा सुटल्याने श्री. दत्त मंदिरासमोर बसलेल्या चौघांना जोरदार धडक बसली.

यात वसंत भाईदास पाटील (वय – ४२) रा. सुरत, विनोद पाटील (५०, रा. पाचोरा), अमोल वाघ (वय – २७, रा. पाचोरा ) व कुंदन परदेशी (वय – १७ रा. पुनगाव ता. पाचोरा) या चौघांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, या धडकेत वंसत पाटील व विनोद पाटील यांचे गुडघ्यापासुन दोन्ही पाय निकामी झाले आहेत. तर, उर्वरित दोघे जखमी झाले आहेत.

जखमींना तात्काळ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिकअपच्या ड्रायव्हर व क्लिनरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now