जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२३ । राजकारणातील एक सगळ्यात मोठी बातमी समोर आलीय. ती म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदारुन निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. ‘लोक माझे सांगाती’ च्या सुधारीत आवृत्तीचे आज प्रकाशन आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. परंतु ते निवृत्त कधी होणार याबाबत त्यांनी सांगितलं नाही.
दरम्यान, शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडेल असे धक्कादायक खुलासे आहेत. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी अनेक आठवणी सांगितल्या. त्याचवेळी धक्कादायक खुलासा केला. आपण अध्यक्षपदारुन निवृत्त होत असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.
मात्र शरद पवारांच्या या घोषणेनंतर अनेक नेत्यांना अश्रू अनावर झाले आहेत. ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार’ अशा घोषणा देण्यात आल्या. राजीनामा मागे घेण्यासाठी धनंजय मुंडे शरद पवारांच्य पाया पडले. राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. अनेक कार्यकर्ते या वेळी भावूक झाले आहेत. सभगृहात मोठा गोंधळ उडला आहे.