---Advertisement---
जळगाव शहर

आधी भाजपच्या तर आता शिवसेनेच्या गटनेते पदावर शिंदे गटाचा दावा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२३ । जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये सुरू असलेल्या कारभाराबाबत नागरिक आधीच चक्रावून गेले आहेत. त्यातच आता अजून एक चक्रावून टाकणारी घटना जळगाव शहर महानगरपालिकेच्या महासभेत झाली.

jalgaon manapa

ती म्हणजे, जळगाव शहर महापालिकेच्या शिवसेनेचे गट नेते पदावर शिंदे गटाच्या नगरसेवक असलेले मनोज चौधरी यांनी दावा केला. खरं म्हणजे हे शिवसेनेची अंतर्गत बाब असल्यामुळे याकडे आश्चर्यासारखे पाहणे काही मोठी गोष्ट नाही. धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष हा शिंदे गटाला मिळाला असल्यामुळे त्यांनी हा दावा केला असावा असे म्हटले जात आहे.

---Advertisement---

मात्र यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशाच प्रकारचा दावा हा शिंदे गटाचे नगरसेवक असलेले दिलीप पोकळे यांनी भाजप बाबत केला आहे. ॲड दिलीप पोकळे हे शिंदे गटाचे असूनही ते भाजपचे अधिकृत गटनेते असल्याची केस सध्या सुरू आहे. मात्र ही केस सुरू असतानाच आता मनोज चौधरी यांनी गटाचे पदावर दावा केल्याने आता शिंदे गटाचे नगरसेवक भाजपचे आणि शिवसेनेचे गटनेते होणार का हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---