RBI कडून 8 सहकारी बँकांचे परवाने रद्द! व्यवहार करता येणार नाहीत; यात तुमचे खाते तर नाही?

एप्रिल 20, 2023 11:48 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२३ । तुमचे बँक खाते सहकारी बँकेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने (RBI) धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या वर्षभरात आठ बँकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

rbi jpg webp

नियमांचे पालन न केल्याने रिझर्व्ह बँकेने या बँकांवर ११४ वेळा दंडही ठोठावला आहे. सहकारी बँकांच्या माध्यमातून ग्रामीण भागात बँकिंग सेवेचा झपाट्याने विस्तार झाला आहे. मात्र या बँकांमधील अनियमितता समोर आल्याने आरबीआयला कठोर पावले उचलावी लागली. चला जाणून घेऊया RBI ने कोणत्या आठ बँकांचे परवाने रद्द केले?

या बँकांचे परवाने रद्द करण्यात आले

  1. मुधोळ सहकारी बँक
  2. मिलाथ को-ऑपरेटिव्ह बँक
  3. श्री आनंद को-ऑपरेटिव्ह बँक
  4. रुपी को-ऑपरेटिव्ह बँक
  5. डेक्कन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक
  6. लक्ष्मी सहकारी बँक
  7. सेवा विकास सहकारी बँक
  8. बाबाजी दाते महिला अर्बन बँक

रिझव्‍‌र्ह बँकेने वर नमूद केलेल्या बँकांचे परवाने अपुरे भांडवल, बँकिंग नियमन कायद्याच्या नियमांचे पालन न केल्यामुळे झाले. भविष्यातील उत्पन्नाच्या शक्यता नसल्यासारख्या कारणांमुळे देखील रद्द केले. गेल्या अनेक वर्षांपासून सहकारी बँकिंग क्षेत्रावर आरबीआयकडून देखरेख केली जात आहे. मध्यवर्ती बँकेने 2021-22 मध्ये 12 सहकारी बँकांचे, 2020-21 मध्ये 3 सहकारी बँकांचे आणि 2019-20 मध्ये दोन सहकारी बँकांचे परवाने रद्द केले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now