7वी पाससाठी मुंबई उच्च न्यायालयात 160 जागांवर भरती, (आज शेवटची संधी)

एप्रिल 7, 2023 12:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । मुंबई उच्च न्यायालयामार्फत मोठी भरती जाहीर करण्यात आलेली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली. शिपाई/हमाल या पदांसाठी ही भरती होणार असून 7वी पास उमेदवारांसाठी नोकरीची ही मोठी संधी असू शकते. Bombay High Court Recruitment 2023

Bombay High Court

तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2023  (05:00 PM) आहे. Bombay High Court Bharti

एकूण रिक्त पदे : 160

भरली जाणारी पदे :
शिपाई/हमाल या पदांसाठी ही भरती आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता: उमेदवार हा किमान 07वी उत्तीर्ण.
वयाची अट: 24 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 25 रुपये/-

किती पगार मिळेल? :
निवड झालेल्या उमेदवारांना 15000 ते 47600 पर्यंत पगार दिला आहे. तसेच नियमाप्रमाणे भत्ते मिळतील.

नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 एप्रिल 2023 (05:00 PM)

चारित्र (वर्तवणूक) प्रमाणपत्र: पाहा

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना
१. संगणकीकृत प्रोग्रामद्वारे ऑनलाईन अर्जाची छाननी केली जाईल म्हणून ऑनलाईन अर्ज भरणे सुरु करण्यापूर्वी उमेदवाराने शिपाई / हमाल पदासंबंधीची संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. ऑनलाईन अर्ज हा इंग्रजी भाषेत भरला जाईल.
२. ‘शिपाई / हमाल’ पदासाठी इ. ७ वी मधील गुण नमूद करणे अनिवार्य असेल. ‘शिपाई/ हमाल’ पदासाठी जर उमेदवार इ. ७ वी ची परीक्षा उत्तीर्ण असेल आणि पुढील उच्च अर्हता प्राप्त उदा. १० वी किंवा १२ वी असेल व त्याच्याकडे/तिच्याकडे इ. ७ वी चे गुणपत्रक नसेल तर, त्याने/तिने ‘ऑनलाईन’ अर्ज भरताना इ. ७ वी करिता काल्पनिकरित्या ५०% गुणांची (उदा. एकूण १०० पैकी ५० गुण प्राप्त) नोंद करावी जेणेकरुन त्याचा / तिचा अर्ज संगणकाकडून स्विकृत केला जाईल.

अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Online अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now