जळगाव शहर

महामार्गावर रद्दी वाहून नेणारा उलटला ट्रक अन्..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२३ । रद्दीची वाहतूक करणारा भरधाव ट्रक महामार्गावर उलटल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. अपघातामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

पोलिस प्रशासनाने धाव घेत वाहतूक सुरळीत केली तर क्रेनद्वारे अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्यात आला. या प्रकरणी मात्र पोलिसात गुन्हा दाखल नसल्याचे म्हटले जात आहे.

अधिक माहिती अशी कि, औरंगाबादकडून बर्‍हाणपूरच्या दिशेने निघालेला ट्रक (एम.पी.12 एच .0493) हा रेल्वे उड्डाणपुलावर सोमवारी पलटी झाला. सुदैवाने या अपघातात जिवीतहानी टळली असलीतरी चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाल्याचे समजते. रस्त्यावरच उलटलेल्या ट्रकमुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती कळताच पोलिस प्रशासनाने धाव घेत वाहतूक सुरळीत केली तर क्रेनच्या सहाय्याने ट्रक रस्त्यावर पुन्हा उभार करण्यात आला. अपघातामुळे ट्रकमधील रद्दी मात्र सर्वत्र विखूरली होती.

Related Articles

Back to top button