⁠ 
शुक्रवार, जानेवारी 10, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | तब्बल ४ दिवस पूनमने दिली मृत्यूशी झुंझ : मात्र..

तब्बल ४ दिवस पूनमने दिली मृत्यूशी झुंझ : मात्र..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२३ । महामार्गावरील औद्योगिक शिक्षण संस्थे समोर सुरू असलेल्या महामार्गाच्या दुरुस्तीच्या ठिकाणी मंगळवारी मोठा अपघात झाला. या ठिकाणी तरुणी गंभीर जखमी झाली होती. मात्र त्या तरुणीची मृत्यूशी असलेली झुंज अखेर संपली. उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे

पुनम सुनील विसपुते (वय 27) असे या तरुणाचे नाव आहे. उपचारादरम्यान शनिवारी रात्री तिचा मृत्यू झाला. पूनमच्या मृत्यूमुळे कुटुंबासह परिवारामध्ये शोककळा पसरली आहे

महामार्गावर ज्या ठिकाणी दुरुस्तीचे काम चालू आहे. त्याच जागेवर मंगळवारी तीन अपघात झाले. सकाळी सहा वाजता पुनमचा अपघात झाला होता. त्यानंतर अजून काही अपघात झाले

ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी सकाळी सहा वाजता पूनमची दुचाकी घसरली आणि तिचा अपघात झाला. पूनम एका खाजगी जिम मध्ये काम करत होती. तरुणीचा अपघात झाल्याने घटनास्थळी गर्दी झाल्याचे दिसले. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर पुनमच्या जिम मधील सहकारी लोकेश बोरसे त्या ठिकाणी जात होता. अपघात झालेली व्यक्ती पुनम आहे असं त्याला समजत असल्याने पूनमला त्याने रुग्णालयामध्ये दाखल केले. जिथे ४ दिवस झुंज देऊनही तिचा मृत्यू झाला.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह