ग्राहकांना दिलासा! सुवर्णनगरीत रेकॉर्ड स्तरापासून सोनं 2000 रुपयांनी घसरले, वाचा आजचा दर

फेब्रुवारी 16, 2023 11:47 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२३ । तुम्हाला सोने किंवा चांदी (Gold Silver Rate) खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. किंबहुना, जागतिक बाजारातील कमजोरीच्या ट्रेंडमध्ये भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवली गेली. बजेटनंतर (अर्थसंकल्प 2023) सोन्याचा भाव 58000 रुपायांवर गेला होता. मात्र गेल्या काही जळगाव सुवर्णनगरीत सोन्याच्या किमतीत जवळपास 2000 रुपयाची घसरण झालेली दिसून येतेय.

gold silver jpg webp

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आजचा दर?
काल सत्रात झालेल्या घसरणीनंतर आज गुरुवारी सोन्याच्या किमतीत किंचित घसरण दिसून आलीय. मात्र आज चांदीच्या किमतीत वाढ झालेली आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सकाळी 11 वाजेपर्यंत 10 ग्रॅम सोन्याच्या किंमत 40 रुपयांनी घसरणी आहे. यामुळे प्रति तोळा सोन्याचा दर 56,085 रुपयावर व्यवहार करत आहे. दुसरीकडे आज चांदीच्या किमतीत 194 रुपयाची वाढ झाली आहे. यामुळे प्रति किलो चांदीचा दर 65,615 व्यवहार करत आहे.

जळगावातील दर
दरम्यान, जळगाव सवर्णनगरीत गेल्या काही दिवसात सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी घसरण झालेली आहे. 2 फेब्रुवारी 2023 ला सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव तब्बल 58800 रुपायांवर गेला होता. मात्र आता सोने सर्वकालीन उच्चांकावरून 2000 हजार रुपयांनी घसरले आहे. आज गुरुवारी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,800 रुपये इतका आहे. तर चांदी दर 67000 रुपये प्रति किलो इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

दरम्यान, सोन्याचे दर आणखी कमी होईल, अशी आस अनेकजन लावून बसले आहेत. लग्न सराईमध्ये दागिन्यांची मागणी वाढत असते. अशातच तज्ज्ञांच्या मते आगामी काळात सोन्याचे दर 60 हजार रुपयाचा टप्पा गाठू शकतो. 

शुद्ध सोने कसे ओळखावे?

सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. बीआयएस केअर (BIS Care) अ‍ॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता. हे अ‍ॅप आपल्याला प्रत्येक प्रकारे मदत करते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now