⁠ 
सोमवार, सप्टेंबर 23, 2024
Home | नोकरी संधी | राज्यात डॉक्टर, टेक्निशियनच्या 4500 जागा लवकरच भरणार ; मंत्री. महाजनांची विधानसभेत घोषणा

राज्यात डॉक्टर, टेक्निशियनच्या 4500 जागा लवकरच भरणार ; मंत्री. महाजनांची विधानसभेत घोषणा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२२ । नोकरीच्या शोधात असलेल्या राज्यातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकार टीसीएसच्यामाध्यमातून लवकरच डॉक्टर, टेक्निशियनच्या साडे चार हजार जागा भरणार असल्याची घोषणा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी विधानसभेत केली.

हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आरोग्याच्या अनुषंगाने विधानसभेत प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना गिरीश महाजन यांनी ही घोषणा केली. तसेच हाफकिनकडून औषध खरेदी थांबवण्याचा निर्णय झाला नसल्याचंही त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?
आरोग्य विभागाचं तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाचे एकूण जे बजेट असतं त्या बजेटपैकी विदर्भाकरता एकूण किती निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे, असा सवाल अजित पवार यांनी विचारला.अजित पवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना विदर्भासाठी राज्य सरकारने काय काय निर्णय घेतले याची माहिती दिली. तसेच वैष्णवीच्या मृत्यूची माहितीही दिली. वैष्णवीला जेएमसी नागपूर येथे आणण्यात आलं होतं. त्यावेळी व्हेंटिलेटर तिथं उपलब्ध न झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला.

त्यामुळे डॉक्टरांवर आरोप झाले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी म्हैसेकर नावाच्या डॉक्टरांची समिति नेमली आहे. डीन गुप्ता यांना तत्काळ कार्यमुक्त केलं आहे आणि डॉ. सपकाळ जे व्हेंटिलेटर उपलब्ध करू शकले असते त्यांनी न केल्यामुळे त्यांना पदावरून हटवलं आहे, असं महाजन यांनी स्पष्ट केलं.

आम्हीं एमपीएससीच्या माध्यमातून 300 डॉक्टर भरले आहेत. सध्या 28 टक्के पदे रिक्त आहेत. आम्ही मेडिकल बोर्ड तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून लवकरच पदभरती करता येईल. यासाठी आम्ही प्रयत्न करतं अहोत. एमपीएससी मार्फत जागा भरण्यास वेळ लागतो, अशी माहितीही त्यांनी सभागृहाला दिली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.