जळगाव दूध संघाच्या मतदानादिवशीच गिरीश महाजनांचा खडसेंवर गंभीर आरोप

डिसेंबर 10, 2022 11:00 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२२ । जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत असून अशातच राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीष महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांना खोक्यावरून डिवचलं आहे. आता यावरूनच गिरीष महाजन यांनी खडसेंवर आरोप केले आहेत.

girish mahajan eknath khadse

काय म्हणाले महाजन?

जळगाव जिल्हा दूध संघात तुम्ही सात वर्षात काय दिवे लावले तूप खाल्लं, लोणी खाल्लं त्यामुळे खडसेंनी पराभवाचे कारण शोधू नये असा पलटवार गिरीश महाजन यांनी खडसेंवर केला. दुसऱ्यावर आरोप करून आपण म्हणता खोके वाटले, पेट्या वाटल्या तुम्ही काय आहात हे लोकांना सगळं माहिती आहे.

आता सगळे लोक तुम्हाला कंटाळलेले आहेत तुम्ही सात वर्षात काय दिवे लावलेले सर्व जनतेला माहिती आहे. तुमचे काही लोक जेलमध्ये अटकेत आहेत त्यामुळे तुम्ही आता काही म्हणाला तर तुमचा पराभव हा अटळ आहे. लोकांनी ठरवलं आहे तुम्हाला दूध संघातून बाहेर काढायचं आहे. असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना लगावला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now