घरकूल घोटाळा : माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना जामीन मंजूर

नोव्हेंबर 30, 2022 1:53 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२२ । राज्यातील बहुचर्चित घरकुल घोटाळ्याप्रकरणी वैद्यकीय कारणास्तव अंतरीम जामिनावर असलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन (Suresh Jain) यांना आज मुंबई खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. आ.जैन यांच्या निकटवर्तीयांनी वृत्ताला दुजोरा दिला असून अटी, शर्थी सायंकाळी कळणार असल्याचे समजते. मात्र सुरेशदादा जैन यांना जामीन मिळताच दादा प्रेमी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जळगावात जल्लोष करण्यात आला.

suresh jain jpg webp

राज्यातील बहुचर्चित घरकुल प्रकरणी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह अनेक दिग्गज मंत्री, आमदार, नगरसेवक यांना ऑगस्ट २०१८ महिन्याच्या अखेरीस धुळे जिल्हा न्यायालयाने शिक्षा आणि दंड ठोठावला होता. यानंतर बहुतांश संशयितांची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली होती. यातील काही अपवाद वगळता इतरांना जामीन मंजूर करण्यात आला होता. तथापि, प्रमुख संशयित सुरेशदादा जैन यांना दिलासा मिळाला नव्हता.

माजी सुरेशदादा जैन यांच्या जामिनासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले तरीही त्यांना जामीन मिळालेला नव्हता. २०१९ मध्ये प्रकृतीच्या कारणास्तव जैन यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, बुधवार दि.30 नोव्हेंबर रोजी सुरेशदादा जैन यांना मुंबई खंडपीठाने जामीन मंजूर केला असल्याचे वृत्त समोर आले आहे. जैन यांच्या निकटवर्तीयांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now