---Advertisement---

आज मुंबईतील 27 तासांच्या मेगाब्लॉकमुळे भुसावळामार्गे धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द ; पटापट जाणून घ्या

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२२ । छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मशीद स्टेशन दरम्यानच्या कर्नाक उड्डाणपुलाच्या तोडकामासा रात्रीपासून सुरवात झाली असून यामुळे 27 तासांचा मेगाब्लॉक सुरू करण्यात आला आहे. यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात भुसावळ मार्गे धावणाऱ्या अनेक गाड्यांचा समावेश आहे.

मशीद स्टेशन दरम्यानचा कर्नाक उड्डाणपुल हा 154 वर्ष जुना पूल धोकादायक ठरल्याने उड्डाणपुलाच्या तोडकामास सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवर सीएसएमटी-भायखळा, सीएसएमटी-वडाळा आणि मेल-एक्स्प्रेस कोचिंग यार्डवर तब्बल 27 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आलाय. त्यामुळे या काळात सीएसटीएमहून भायखळ्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि भायखळ्याहून सीएसटीएमकडे येणारी रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. सीएसएमटी-भायखळा मार्ग 17 तासांनी, तर सीएसएमटी-वडाळा मार्ग 21 तासांनी पूर्ववत होणार आहे.

डाउन ट्रेन्सचे शॉर्ट ओरीजनेशन
आज दादर येथून सुटणाऱ्या गाड्या

1) 22177 मुंबई – वाराणसी महानगरी एक्सप्रेस

2) 12051 मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस

3) 22105 मुंबई – पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस

4) 22119 मुंबई-करमळी तेजस एक्सप्रेस

5) 12859 मुंबई – हावडा गीतांजली एक्सप्रेस

6) 12534 मुंबई – लखनऊ जंक्शन पुष्पक एक्सप्रेस

7) 12869 मुंबई – हावडा एक्सप्रेस

8) 22159 मुंबई – चेन्नई सेंट्रल एक्स्प्रेस

9) 11019 मुंबई – भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस

10) 22732 मुंबई – हैदराबाद एक्सप्रेस

11) 22221 मुंबई – निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस

12) 12261 मुंबई – हावडा दुरांतो एक्सप्रेस

13) 12105 मुंबई – गोंदिया विदर्भ एक्सप्रेस

14) 12137 मुंबई – फिरोजपूर पंजाब मेल

15) 12289 मुंबई – नागपूर दुरांतो एक्सप्रेस

16) 22107 मुंबई – लातूर एक्सप्रेस

17) 12809 मुंबई – हावडा मेल नागपूर मार्गे

18) 12322 मुंबई – हावडा मेल प्रयागराज छिवकी मार्गे

19) 22157 मुंबई – चेन्नई एग्मोर एक्सप्रेस

20) 11057 मुंबई – अमृतसर एक्सप्रेस

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---