⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

भुसावळ शहर हादरले! अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात माजी नगरसेवकासह सामाजिक कार्यकर्ताचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | 29 मे 2024 | जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी डोक वर काढतांना दिसत असून याच दरम्यान, भुसावळ शहर गोळीबाराच्या घटनेने हादरले आहे. अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात माजी नगरसेवकासह सामाजिक कार्यकर्ताचा मृत्यू झाला. ही घटना दि 29 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेने शहरात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, जुन्या वादातून ही हत्त्या झाल्याचा अंदाज वक्त केला जात असून पोलीस गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांची माहिती गोळा करीत आहे

याबाबत असे की, भुसावळ शहरातील न्यू सातारा रोडवरील मरीमाता मंदिर परिसरात दि 29 रोजी रात्री साधारण १० वाजेच्या सुमारास माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष राखुंडे हे दोघे कार मध्ये बसलेले असताना दोघांवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून त्यांना भुसावळ शहरातील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. तिथं डाक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली असून सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रवाना झाले आहेत. जुन्या वादातून ही हत्त्या झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान खुणाच्या घटनेमुळे भुसावळ पुन्हा एकदा हादरले आहे भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक गजानन पडघन आणि त्यांचे सहकारी फरार संशयित आरोपींविषयी माहिती गोळा करीत आहेत. दोघ मयत यांना जळगाव शासकीय महाविद्यालय येथे शवच्छेदनासाठी पाठविण्यात