.. म्हणून महाजनांनी माझे पाय धरले होते, खडसेंचा धक्कादायक दावा

नोव्हेंबर 17, 2022 10:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि यांच्यात कलगीतुरा रंगताना दिसतो. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत जेव्हापासून प्रवेश केलाय तेव्हापासून खडसे-महाजन यांच्यात वारंवार वादविवाद होताना दिसतात. अशातच आता खडसेंनी महाजन यांच्याबद्दल धक्कादायक दावा केलाय.

eknath khadse girish mahajan jpg webp

नेमका काय आहे दावा?
एकनाथ खडसे यांनी भाजपात असतानाचा एक पक्षांतर्गत किस्सा सांगितलाय. यावेळी त्यांनी गिरीश महाजनांवर निशाणा साधला. “जामनेरमध्ये काँग्रेस (Congress) नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची जंगी सभा झाली होती. तेव्हा गिरीश महाजनांनी धावत पळत येऊन माझे पाय धरले होते”, असा दावा एकनाथ खडसेंनी केलाय.“राजकारणात मी गिरीश महाजनांना मदत केली, आज मीच दुश्मन झालो”, असं सांगत खडसेंनी खंत व्यक्त केली.

महाजन यांच्यासाठी मी शत्रुघ्न सिन्हा
“गिरीश महाजन यांच्यासाठी मी शत्रुघ्न सिन्हा यांची बोदवडला होणारी सभा जामनेरला घेतली. सोनिया गांधी यांच्या सभेपेक्षा ती सभा मोठी झाली म्हणून वातावरण बदललं आणि गिरीश महाजन निवडून आले होते”, असा दावा एकनाथ खडसेंनी केला. असं असताना आता तेच गिरीश महाजन नाथाभाऊला बघून घेईन अशी भाषा करतात. ईडी लावू, सीडी लावू, इन्कम टॅक्सची चौकशी लावून बघूनच घेतो नाथाभाऊ तुला”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now