⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | नाशिक विभाग : पदवीधर मतदार नोंदणीला मुदतवाढ

नाशिक विभाग : पदवीधर मतदार नोंदणीला मुदतवाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तहसील कार्यालय येथे नाशिक पदवीधर मतदार संघ मुदतवाढ व मतदान कार्ड ला आधार लिंग बाबत बैठक नुकतीच संपन्न झाली. यात पदवीधर मतदार संघ फॉर्म भरणेसाठी अंतिम तारीख दि. ७ नोव्हेंबर देण्यात आली होती, त्यात पुन्हा वाढ करण्यात आली असून २३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

तसेच मुक्ताईनगर विधानसभा मतदार यादीत काही दुरुस्ती करायची असेल तर उदा. (फोटो,जन्म तारीख,नाव,गाव,) तर ९नोव्हेंबर २०२२ ते ८ डिसेंबर २०२२ पर्यंत बीएलओ कडे अथवा निवडणूक शाखा कार्यालय मुक्ताईनगर येथे करता येईल व राहिलेले पदवीधर यांना देखील फॉर्म भरण्याची अवधी निवडणूक आयोगाने वाढवली आहे त्यासाठी इच्छुकांनी फॉर्म भरून मतदानाचा अधिकार प्राप्त करून घ्यावा, असे निवासी नायब तहसीदार प्रदीप झांबरे यांनी उपस्थित बैठकीस संबोधन केले.

तालुक्यातील पदाधिकारी मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोई, हार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष राजू सांगळकर, प्रहार अपंग क्रांती अध्यक्ष उत्तम जुंबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रवी दांडगे मनसे गण अध्यक्ष सुनील कोळी,प्रहार उपाध्यक्ष सुरेश पाटील, निवृत्ती कोळी मंगेश कोळी आदी तालुक्यातील पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह