जळगाव शहर

रायसोनी महाविद्यालयात मौलाना आझाद जयंती उत्साहात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२२ । भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ दरवर्षी ११ नोव्हेंबर रोजी देशात साजरा केला जातो या निमित्त जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलतर्फे विद्यार्थ्यांसाठी वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

“रोल ऑफ एज्युकेशन टू सोल्व्ह सोशल अँड लोकल प्रोब्लेम्स इन सोसायटी” या विषयावर यावेळी वादविवाद व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत अभियांत्रिकी व बिजनेस मॅनेजमेंट शाखेतील विविध विभागातील विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धेचे उद्घाटन रायसोनी इस्टीट्युटचे ऑकडमीक डीन प्रा. डॉ प्रणव चरखा यांनी केले. यावेळी त्यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांनी 15 ऑगस्ट 1947 ते 2 फेब्रुवारी 1958 पर्यंत देशाचे शिक्षण मंत्री म्हणून काम केले. 2008 मध्ये, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्यांचा वाढदिवस शिक्षण दिन म्हणून साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी 11 नोव्हेंबर हा दिवस शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो अशी माहिती विध्यार्थ्यांना देत त्यांनी सामाजिक जीवनातील विविध समस्याबद्दल मार्गदर्शन केले.

यावेळी स्पर्धेला प्रा. प्रमोद गोसावी, प्रा. अंकुर पांडे, प्रा.मधुर चव्हाण, प्रा. अमित म्हसकर आदी उपस्थित होते. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी समन्वय इनोव्हेशन व इनक्युबेशन सेंटरचे डीन प्रा. डॉ. सौरभ गुप्ता यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेचे उत्तम नियोजन केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले.

Related Articles

Back to top button