जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२२ । धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथे एक वृद्धाला शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील बोरखेडा येथील वसंत जयराम पाटील (वय ६५) यांच्या शेतात दि. २४ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी स्वप्नील गोरख पाटील, गोरख जयराम पाटील, अरुण जयराम पाटील, आशाबाई गोरख पाटील, लताबाई गोरख पाटील, अतुल अरुण पाटील, सर्व रा. बोरखेडा या सर्वांनी एकत्र येत शेतात बैलगाडी आणून शिवीगाळ करीत वृद्धाला जबर मारहाण केली.
याप्रकरणी धरणगाव पोलिसात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. मोती पवार हे करीत आहेत.