मोठी बातमी : मेहरूण तलावाच्या सांडव्याला भगदाड, हजारो लीटर पाण्याची नासाडी
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२२ । मेहरूण तलावाच्या सांडव्याला भगदाड पडले असून हजारो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून गणेश घाट येथील तीन ते चार टप्पे पाणी वाहून गेला आहे. दरम्यान, पाणी अडवून ठेवणारी बांध कोणी अज्ञात व्यक्तीने तोडल्याचे बोलले जात आहे.
सविस्तर असे की, मेहरूणकडे जाणारे रस्त्यावरील पाणी अडवून ठेवणारी बांध कोणी अज्ञात व्यक्तीने तोडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे . केवळ तीन दिवसात गणेश घाट येथील तीन ते चार टप्पे पाणी वाहून गेला आहे. एवढ्या जोरात पाणी वाहून गेला तर भविष्यात तलावातील पाणी शिल्क राहणार नाही, त्यामुळे शासनाने वेळीच पुढकार घेवून भिंती चे काम करावे अशी, मागणी हास्य क्लब ग्रूप मेहरून तलाव आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे तालुका अध्यक्ष महेश चावला यांनी केली आहे.
याबाबत महेश चावला यांनी महानगरपालिका, कलेक्टर जळगाव, काही नगर सेवकांना तसेच प्रसार माध्यमांना व्हॉट्सॲप व ईमेल द्वारे कळविली. तसेच हा विषयाला अती गंभीरतेने घ्यावे आणि मेहरुन तलावाची सुंदरता वाचवावे, असे विनंतीही महेश चावला यांनी केले.