---Advertisement---
राष्ट्रीय

KBC: ‘हा’ प्रश्न अटलबिहारी वाजपेयींशी संबंधित 75 लाखांचा होता, तुम्हाला उत्तर माहित आहे का?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२२ । ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) हा शो नेहमीच चर्चेत असतो. सध्या या शोचे १४वे पर्व सुरु आहे. या दरम्यान, शोचे सूत्रसंचालन बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) करत आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये एकापेक्षा एक प्रश्न विचारले जातात. हे सर्व प्रश्न सामान्य ज्ञानाशी संबंधित आहेत. असे अनेक प्रश्न आहेत, ज्यावर स्पर्धक लाखो रुपये जिंकतात. असाच एक प्रश्न स्पर्धक विक्रम खुराणाला विचारण्यात आला. ज्यावेळी अमिताभ यांनी हा प्रश्न विक्रम खुराणा यांना विचारला, त्यावेळी त्यांनी बरोबर सांगितले असते तर त्यांना ७५ लाख रुपये मिळाले असते, म्हणजेच त्यावेळी हा प्रश्न ७५ लाख रुपये होता. KBC मध्ये विचारले जाणारे सामान्य ज्ञानाचे प्रश्न UPPAC बँक रेल्वे सारख्या अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये देखील विचारले जातात.

Kaun Banega Crorepati jpg webp

तुम्हाला उत्तर माहित आहे का?
अलीकडेच, अटलबिहारी वाजपेयींशी संबंधित प्रश्न असा होता की लाहोरच्या पहिल्या सदा-ए-सरहद बस प्रवासादरम्यान, अटलबिहारी वाजपेयींनी कोणत्या ज्ञानपीठ विजेत्याच्या कविता घेतल्या होत्या?, अली सरदार जाफरी, फिराक गोरखपुरी, शहरयार, सुमित्रानंदन यांचे नाव दिले गेले होता. या प्रश्नाचे उत्तर आहे अली सरदार जाफरी.

---Advertisement---

याआधीही अनेकवेळा अमिताभ बच्चन यांनी केबीसीमध्ये असे अनेक प्रश्न विचारले आहेत, जे सामान्य ज्ञानाचे आहेत. असाही प्रश्न होता की, प्रयोगशाळेत माकडांमध्ये मंकीपॉक्सची पहिली घटना कोणत्या शहरात आढळून आली? त्याला उत्तर म्हणून त्यांनी जोहान्सबर्ग, क्वालालंपूर, टोकियो, कोपनहेगन असे चार पर्याय दिले. ज्याचे योग्य उत्तर कोपनहेगन होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---