⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | तालखेड्याला सृजन शिबिराचे आयोजन

तालखेड्याला सृजन शिबिराचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Muktainagar news-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील तालखेडा येथे मानवता सेवा संस्था आणि रुद्र वेलफेअर यांच्या संयुक्त विद्यमाने कुमारवयीन मुलांसाठी सृजन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर दि. २८ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरदरम्यान होणार असून ६वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घ्यावा, तसेच यात केवळ ५० विद्यार्थ्यांचा प्रवेश असून १५ ऑक्टोबरपर्यंत गुगल फॉर्म च्या माध्यमातून किंवा आयोजकांना (9926216749, 9503036765) संपर्क करून आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

पौगंडावस्था म्हणजे कुमारावस्था, प्रत्येकाच्या जीवनातील हा अतिशय महत्वाचा टप्पा, केवळ शरीरीकच नव्हे तर मानसिक उलथापालथीचा सुद्धा वळण रस्ता, योग्य दिशादर्शन मिळालं तर सृजन आणि नाही मिळालं तर खच्चीकरण अशा या वळणावर सजग पालक आपल्या मुलांची काळजी घेतात. मात्र, ज्या पालकांना याची जाणीव नसते त्यांच्या मुलांचे आयुष्य चुकीच्या दिशेने जाते, अशा कुमारांची योग्य जडणघडण व्हावी, यासाठी मानवता सेवा संस्था, तालखेडा आणि रुद्र वेलफेअर फाउंडेशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सृजन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील हे पहिले शिबीर असल्याने विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन मानवता सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. सकाळच्या योगासनांपासून सुरुवात होईल. त्यानंतर श्रमकार्य, वेगवेगळी संवादसत्रे, कृतीयुक्त प्रेरक व मजेशीर गाणी, खेळ, जंगल सफारी, आदिवासी गावांना भेटी, गटकार्ये, आकाश निरीक्षण, प्रेरणादायी शॉर्ट फिल्म बघून त्यावर चर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींसोबत आंतरक्रिया, शैक्षणिक संधी, करिअरच्या वाटा, पालकांसोबत सुसंवाद, मुलांना व्यक्त होता येणे, न्यूनगंड, भीती यातून बाहेर कसे पडायचे, आपल्या क्षमतांचा वापर कसा करायचा अशा अनेक उपक्रमांचा या शिबिरात समावेश असेल.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह