⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | लंम्पीमुळे दगावलेल्या गुरांची तात्काळ भरीव मदत द्या : मनसे

लंम्पीमुळे दगावलेल्या गुरांची तात्काळ भरीव मदत द्या : मनसे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

muktainagar news- जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । तालुक्यातील शेतकऱ्यांची तथा पशुपालकांचे गुरे लंम्पी मध्ये मृत होऊन खुप मोठे नुकसान झाले असून त्यांना तात्काळ व भरीव मदत द्यावी, अशी मागणी मनसेतर्फे तहसीलदार श्वेता संचेती यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील साधारणतः तीनशेच्या जवळ पास लंम्पी महामारी आजाराने जनावरे दगावली आहे त्यात बैल,गायी,वासरू यांचा समावेश आहे. मनुष्य बळ कमी पडल्याने गुरे ढोरे वाचवता आली नाही. तसेच काही पशुपालकांनी लंम्पीग्रस्त मृत बैल,गायी वासरू यांची परस्पर विल्हेवाट लावली आहे.त्यामुळे शासन दरबारी रसिस्टर प्रमाणे मृत नोंदी मध्ये तफावत आहे. त्यामुळे बहुतेक शेतकरी अडचणीत आहे,या आजारामुळे त्यांना त्यांचा सर्जा राजा सोबत गो माता सुध्दा डोळ्यांसमोर तडफडत बळी पावलेल्या आहे. औत,पेरणी, डवरा करणारा सर्जा आज त्यांच्यात नाही. सच्चा सोबती गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे.पुढील शेती काम अपूर्ण अर्धवट आहे.दूध संकलनात ही मोठी घट झाली आहे.शासनाने तुटपुंजी रक्कम न देता एक भरीव रक्कमी ५० हजार पर्यंत एक मृत जनावरांना द्यावी, केळी पीक प्रमाणे बैल विमा देण्यात यावा.बैल जोडी घेण्यासाठी बिनव्याजी कर्ज द्यावे.बाधित झालेले जनावरा बरे होईपर्यंत परिपूर्ण औषध उपलब्ध करून द्यावे.दररोज उपचार करण्यासाठी शेतकऱ्याच्या गोठ्यात गुरे ढोरे यांचेवर औषध उपचार करावे व लंम्पी महाभयंकर आजाराला नियंत्रणात आणून,शेतकऱ्यांना दोन्ही हाताने शासनाने भरीव मदत करावी, असे मनसे तालुका अध्यक्ष यांनी तहसीलदार श्वेता संचेती यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच व्यक्तिगत जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे प्रत पोहच केली आहे.

यावेळी प्रसंगी उपस्थित शेतकरी भास्कर पाटील माजी सरपंच मेळसांगवे,प्रहार अपंग क्रांती तालुका अध्यक्ष उत्तम जूंबळे भीमराव शामराव डहाके,सुरेश वासुदेव चौधरी,अरुण इसा खाटीक,युवराज कालू चव्हाण,ग्राम. प.सदस्य,निवृत्ती कोळी,मनसे सैनिक मंगेश कोळी,सुनील कोळी,गजानन पाटील,आनंद पाटील आदी उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह