muktainagar news-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । व्याघ्र अधिवासक्षेत्र वडोदाक्षेत्रार्तगत डोलारखेडा वनपरिमंडळातील दुई तसेच चारठाणा वनपरीमंडळातील वायला येथे वन्यजीव सप्ताह अनुक्रमे साजरा करण्यात आला. यावेळी निसर्गचक्रात असलेले जंगल व वन्यजीवांचे महत्व, तृणभक्षक व मास़भक्षक वन्यप्राणी याविषयी माहीती देऊन जनजागृती करण्यात आली.
तसेच परिसरात असलेले पट्टेदार वाघांचे अस्तित्व लक्षात घेता वाघांचा अधिवास कायम अबाधित रहावा. वन्यप्राणी-मानव संघर्षाबाबत महत्वपुर्ण माहीती व मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय शेती-शिवारात हिस्र वन्यप्राण्यांपासुन स्वत:ची सुरक्षेबात कशाप्रकारे करायची, कोणती काळजी घ्यावी, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. वनसंवर्धन व वन्यप्राणी संवर्धनास स्थानिकांच्या सहकार्याने हातभार लागावा. वन्यप्राण्यांचे महत्व कळावे. जंगलसीमेवरील स्थानिकांना याबाबत योग्य माहीती ,मार्गदर्शन व सुविधा मिळावी, या हेतुने दरवर्षी जंगल परिसरातील गावांत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन दि. १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर यादरम्यान वनविभाग तसेच वन्यजीव सरंक्षण संस्थांच्या वतीने करण्यात येते. त्यानुषंगाने यंदाही करण्यात आले होते.
जि.प.शाळांतील विद्यार्थ्यांना वन्यजीवांचे महत्व कळावे, वन्यप्राण्यांविषयी मुलांमध्ये असलेली भीती, गैरसमज दुर करुन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करुन वनपाल डी.जी. पाचपांडे यांनी माहीती दिली. परिसरातील वनसंवर्धन क्षेत्र अभयारण्यमध्ये रुपांतर होत आहे. याबाबतही ग्रामस्थांच्या शंका-कुशंकांचे समाधान वनाधिकारी यांनी केले. प्रसंगी वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे, वनपाल डी.जी. पाचपांडे, वनरक्षक दिपाली बेलदार, गोकुळ गोसावी, डी.एस.पवार, बापुसाहेब थोरात, विकास पाटील,वनमुर संजय सांगळकर,योगेश कोळी, अशोक पाटील, देवानंद ठाकरे, वनसमिती अध्यक्ष संदिप जावळे, वनसमिती अध्यक्ष सोपान पिटील,दिपक टाकरखेडे, उपसरपंच संतोष कोळी, रामदास तायडे,प्रकाश वाघ, अनिल ठाकरे, राहुल कुंभार,मंगेश कोळी,प्रदिप तायडे,विशाल पाटिल,शिक्षिका बढे,सरपंच शुभम कोचुरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.