जळगाव शहर
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनो, लक्ष द्या.. ‘या’ ठिकाणी विनामूल्य मार्गदर्शन शिबीराचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२२ । इंडिया आपतक न्यूजतर्फे २ ऑक्टोबर रोजी रविवारी UPSC – MPSC स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर व चर्चा सत्राचे आयोज़न करण्यात आले असून पोलीस मुख्यालयच्या मंगलम हॉल मध्ये हा कार्यक्रम असणार आहे. मार्गदर्शक म्हणून कुमार चिंथा (I.P.S) हे असणार आहेत.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी या विनामूल्य मार्गदर्शन शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.