प्रवाशांनो लक्ष द्या ! आजपासून ‘या’ 10 रेल्वे गाड्या रद्द, रेल्वे स्टेशनवर जाण्यापूर्वी पाहा ही यादी

सप्टेंबर 28, 2022 9:03 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२२ । कोरोनाच्या तब्बल दोन वर्षानंतर सण जल्लोषात साजरे केले जात आहे. गणेत्सवानंतर नवरात्री देखील धुमधडाक्यात साजरी होत आहे. त्यामुळे या काळात देवदर्शनाला जाणाऱ्यांचे प्रमाणही वाढले असल्याचे दिसते. मात्र अशातच भुसावळ विभागातून धावणाऱ्या 10 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आले आहे. २८ सप्टेंबरपासून ते ८ ऑक्टाेबर या काळात या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याने गैरसाेय हाेईल. ऐन सणासुदीत गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना इतर गाड्यांमधून प्रवास करावा लागत आहे.

train 1 jpg webp

नेमकं कारण काय?
मनमाड-दौंड सेक्शनमध्ये डबल लाइन नॉन-इंटरलॉकिंगच्या कामासाठी रेल्वे प्रशासनातर्फे १० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मनमाड-दौंड सेक्शनमध्ये डबल लाइन नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी गाडी क्रमांक ११०४१ दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस २७, २८, २९ सप्टेंबर तर १, ४, ५, ६, ८ ऑक्टोबरला, गाडी क्रमांक ११०४२ साईनगर-दादर एक्स्प्रेस २८, २९, ३० सप्टेंबर तर २, ५, ६, ७, ९ ऑक्टोबरला, गाडी क्रमांक २२११७ पुणे-अमरावती एसी एक्स्प्रेस २८ सप्टेंबर व ५ ऑक्टोबरला, गाडी क्रमांक २२११८ अमरावती-पुणे एसी एक्स्प्रेस २९ सप्टेंबर व ६ ऑक्टोबरला,

गाडी क्रमांक २२१५१ पुणे-काजीपेठ एक्स्प्रेस ३० सप्टेंबर व ७ ऑक्टोबरला, गाडी क्रमांक २२१५२ काजीपेठ-पुणे एक्स्प्रेस २, ९ ऑक्टोबरला गाडी क्रमांक २२१३९ पुणे-अजनी एक्स्प्रेस १ ऑक्टोबर, गाडी क्रमांक २२१४० अजनी-पुणे एक्स्प्रेस २ ऑक्टोबरला, गाडी क्रमांक २२१२३ पुणे-अजनी एसी एक्स्प्रेस ३० सप्टेंबर व ७ ऑक्टोबरला, गाडी क्रमांक २२१२४ अजनी-पुणे एसी एक्स्प्रेस २७ सप्टेंबर व ४ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now