⁠ 
बुधवार, डिसेंबर 18, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | वीज कोसळून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या वारसांना धनादेश वितरित!

वीज कोसळून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या वारसांना धनादेश वितरित!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

amalner News-जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२२ । वीज पडून मृत्यू झालेल्या पारोळा तालुक्यातील पिंपळकोठे येथील शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना चार लाखांची शासकीय मदत मिळाल्याने आ.अनिल पाटील यांच्या हस्ते चार लाखांचा धनादेश मदताच्या वारस पत्नीस देण्यात आला.

पारोळा तालुक्यातील पिंपळकोठे येथे 9 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी पावसात ‘बापू डिगंबर शिरसाठ (वय 44) हे सापडले होते. पाऊस सुरु झाल्यानंतर शेतातून सायकलीवर येताना अंगावर वीज पडल्याने ते जखमी झाले होते. त्यांचा मुंबई येथे उपचारादरम्यान 20 रोजी सकाळी मृत्यू झाला होता. दरम्यान, शासनाने तात्काळ बापू शिरसाठ कुटुंबियांना आर्थिक मदत घ्यावी अशी मागणी आमदारांनी शासनाकडे केली होती,त्यानुसार चार लाख मदत प्राप्त झाल्याने मयताची पत्नी शोभाबाई बापू शिरसाठ यांना सदर धनादेश आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते देण्यात आला, यावेळी तहसीलदार अनिल गवांदे, जिल्हा परिषद सदस्य रोहिदास पाटील, इंधवे येथील सरपंच जितेंद्र पाटील, पिंपळकोठे येथील पोलिस पाटील तापीराम पाटील, महेंद्र पाटील, दत्तात्रय पाटील, राजेंद्र पाटील, सुभाष पाटील, शत्रुघ्न पाटील, महेंद्र पाटील, अक्षय पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार अनिल पाटील यांनी केले सांत्वन
बापू शिरसाठ यांच्या पत्नी, लहान दोन मुलांची भेट घेत आमदारांनी सांत्वन केले व यापुढे ही संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या वेळी पारोळा तहसील अंतर्गत कर्मचाऱ्यांना सूचना देऊन शोभाबाई शिरसाठ यांना पुढील मदतीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या वेळी बापू शिरसाठ यांच्या दोन लहान मुलांना पाहून प्रत्येकाला गहिवरून आले होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह