---Advertisement---
जामनेर

ढालसिंगी येथे जागतिक हिवताप दिन साजरा

dhalsing news
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२१ । ढालसिंगी येथे २५ एप्रिल जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला.आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी या हिवतापा बद्दल सखोल माहिती व मार्गदर्शन केले. हिवताप हा किटकजन्य आजार असुन अनेक आजारांपैकी एक गंभीर व मानवाचा जीवघेणा आजार आहे.भारतात प्लाझमोडियम  व्हायव्हँक्स व प्लाझमोडियम फँल्सीफेरम हे दोन प्रकारचे रोगजंतु आढळतात.या रोगाचे प्रमुख खाद्य हे मानवी रक्तातील तांबड्या रक्तपेशीतील हिमोग्लोबीन आहे.

dhalsing news

या रोगजंतुमुळे हिवताप हा आजार होतो.हिवताप आजाराचा शोध लागलेला नव्हता तोपर्यंत या आजाराबाबत समाजात अनेक गैरसमज पसरलेले होते. व त्यावर योग्य तो उपचार माहित नसल्यामुळे त्यावेळी हिवतापमुळे अनेक लोक मृत्युमुखी पडत होते.सर्वप्रथम सन -1889 मध्ये डाँ.सर रोनाल्ड राँस यांनी रोग जंतुचा शोध लावला. त्यामुळे हिवतापाच्या रुग्णांवर योग्य उपचार देणे शक्य होऊन हिवतापामुळे होणाऱ्या मृत्युंची संख्या कमी झाली.

---Advertisement---

25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिवस म्हणुन जगभरात साजरा केला जातो. हिवतापाचा प्रसार अँनाफेलीस ह्या जातीच्या डासांच्या मादींमार्फत होतो. ह्या मादी स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. त्यांत पाण्याच्या टाक्या,हौद,डबके,नारळाच्या वरवंट्या,कुलर,टायरे,फुलदाण्या आदी ठिकाणी ही मादी अंडी घालतात. हिवताप साथ रोखण्यासाठीच्या उपाय बाबत माहिती दिली. हिवतापाला रोखायचे झाल्यास डासांची उत्पत्ती रोखणे हाच रामबाण उपाय आहे.

डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आठवड्यातुन एक दिवस कोरडा पाळुन घरातील पाण्याची भांडे घासुन-पुसुन कोरडी करणे,पाण्याच्या टाक्यांवर घट्ट झाकणे ठेवावी,परिसरातील पाण्याची डबकी बुजवावे अथवा त्यांत आईल किंवा राँकेल टाकावे,डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडावीत.आरोग्य विभागामार्फत कंटेनर्स सव्हेक्षण करुन पाण्याच्या टाक्यांमध्ये टेमीफाँस  नावाचे औषध टाकले जाते. त्यामुळे डासांच्या अंडी मरुन जातात,असे मार्गदर्शन करण्यात आले.

जळगाव जिल्हा आरोग्यधिकारी डाँ.भिमाशंकर जमादार व जळगाव जिल्हा हिवताप अधिकारी श्रीमती अपर्णा पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार व जामनेर तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ राजेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला.यावेळी ढालगांव उपकेंद्र येथील डॉ.विवेक जाधव, हिवताप तालुका पर्वेक्षक व्ही. एच. माळी,आरोग्य सेवक मनोज परदेशी, एस. डी. नागरगोजे, आशा सेविका कांताबाई गोतमारे, ग्रा. प. सदस्य संभाजी गोतमारे, पोलिस पाटील मिलिंद अहिरे,व गावातील मोजकेच ग्रामस्थ या कार्यक्रम वेळी उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---