जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा रोजच १ हजारांच्या पुढेच येत आहे. आज देखील जिल्ह्यात १ हजार ४८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. समाधानकारक बाब म्हणजे १ हजार १५ लोकांनी कोरोनावर मात देखील केली आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या दिवसापासून रोज समोर येणाऱ्या रुग्णांची संख्या हजाराच्या आसपास स्थिर झाली आहे. सोमवारी ७ हजार ६३८ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ४८ रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख १७ हजार ९१६ झाली. दिवसभरात १ हजार १५ रुग्ण बरेही झाले. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या १ लाख ४ हजार ९०६ वर पोचली आहे. जिल्ह्यातील मृत्युदर अद्यापही चिंतेची बाब आहे. गेल्या २४ तासांत आणखी २१ रुग्णांचा बळी गेला. त्यामुळे बळींचा आकडा २ हजार ९९ झाला आहे.
जळगावात दिलासा
गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहराला दिलासा मिळाला आहे. सोमवारी शहरात १५९ नवे रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे दिवभरात तब्बल २१९ रुग्ण बरे झाले. तर शहरात आज ३ जणांचा मृत्यू झाला.
आजची आकडेवारी
जळगाव शहर- १५९, जळगाव ग्रामीण- ५३, भुसावळ-१५७, अमळनेर-७१, चोपडा- ७२, पाचोरा- ५७, भडगाव-१८, धरणगाव- ४२, यावल- ३३, एरंडोल- ११३, जामनेर- ३७, रावेर- ७४, पारोळा- २८, चाळीसगाव- ६६, मुक्ताईनगर- ३७, बोदवड-१५ आणि इतर जिल्हे १६ असे एकुण १०४८ बाधित रूग्ण आढळले आहे.