⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

ठरलं ! शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार ‘या’ दिवशी होणार? कुणाला मिळणार संधी..

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२२ । महाराष्ट्र्रात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत नवीन सरकार स्थापन केलं. काही दिवसापूर्वी या नव्या सरकरचा मोठ्या प्रतिक्षेनंतर पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार पार पडला होता. आता दुसरा मंत्रिमंडळाचा विस्तार कधी पार पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र अशातच शिंदे, फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Cabinet Expansion) मोठी बातमी समोर येत आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असं वृत्त टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीने दिले आहे.

शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. तसंच पालकमंत्र्यांची घोषणाही त्यामुळे रखडली आहे. त्यामुळे दुसऱ्या विस्ताराकडे शिंदे गट आणि भाजपमधील इच्छुक मंत्री बाशिंग बांधून सज्ज आहे. पण पितृपक्ष आल्यामुळे विस्तार रखडला होता. महिन्याच्या अखेरीस विस्तार होण्याची शक्यता होती. पण, आता विस्ताराला ऑक्टोबरचा पहिला आठवडा उजाडणार आहे. 5 ऑक्टोबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे, असं वृत्त टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीने दिले आहे.

पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना संधी न मिळाल्यामुळे कमालीचे नाराज झाले होते. त्यामुळे दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. याच बरोबर जालन्याचे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर, संभाजी पाटील निलंगेकर, हर्षवर्धन पाटील, बबनराव लोणीकर, बबनराव पाचपुते, राणा जगजितसिंह यांच्यासह जवळपास 50 जणांची नाव चर्चेत आहे. पण, मंत्रिमंडळाची संख्या पाहता यातील अर्ध्याचं नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या मंत्रिमंडळात 19 जणांचा शपथविधी पार पडला आहे. मुख्यमंत्र्यांसह एकूण 43 मंत्र्यांचं जम्बो मंत्रिमंडळ असणार आहे.