⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | नोकरी संधी | नोकरीचा गोल्डन चान्स ! 12वी ते पदवीधरांसाठी तब्बल 20,000 पदांची मेगाभरती, आताच करा अर्ज

नोकरीचा गोल्डन चान्स ! 12वी ते पदवीधरांसाठी तब्बल 20,000 पदांची मेगाभरती, आताच करा अर्ज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी गुडन्यूज आहे. ती म्हणजे कर्मचारी निवड आयोगाने (SSC) अनेक मंत्रालये/विभाग/संस्थांमध्ये रिक्त पदे (SSC CGL Bharti 2022) भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 17 सप्टेंबर २०२२ पासून सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण सुमारे 20000 पदे भरली जातील. SSC CGL Recruitment 2022

महत्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख -८ ऑक्टोबर

एकूण पदांची संख्या – सुमारे 20000

पदाचे नाव:

सहाय्यक लेखा परिक्षण अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक, निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक, निरीक्षक, सहाय्यक / अधीक्षक, विभागीय लेखापाल, उपनिरीक्षक, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, लेखा परीक्षक, कनिष्ठ लेखापाल, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / अपर डिव्हिजन क्लर्क, कर सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता :
असिस्टंट ऑडिट ऑफिसर/ असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर: मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून बॅचलर डिग्री.
कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: 12वी इयत्तेच्या स्तरावर गणितात किमान 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून कोणत्याही विषयातील बॅचलर पदवी; किंवा पदवी स्तरावरील विषयांपैकी एक म्हणून सांख्यिकीसह कोणत्याही विषयातील बॅचलर पदवी.

इतर सर्व पदे: मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष. पदवीच्या अंतिम वर्षात बसलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा :
उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ३२ वर्षे दरम्यान असावी.

पगार : 47600 ते रु. 151100

निवड पद्धत: 
टियर-I: संगणक आधारित परीक्षा.
टियर-II: संगणक आधारित परीक्षा.
टियर-III: पेन आणि पेपर मोड (वर्णनात्मक पेपर).
टियर-IV: संगणक प्रवीणता चाचणी/ डेटा एंट्री कौशल्य चाचणी

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.