बातमी पाण्याची.. उद्या होणार जळगाव शहरात पाणीपुरवठा!

सप्टेंबर 18, 2022 2:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२२ । शहरातील नागरिकांसाठी पाणीपुरवठ्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या दोन दिवसापासून जळगाव शहरामध्ये पाणीपुरवठा झालेला नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लवकरच पाणीपुरवठा होईल अशी नागरिकांची अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली आहे. दरम्यान, जळगाव शहरामध्ये उद्या पाणीपुरवठा होणार असल्याची अशी माहिती पाणीपुरवठा अभियंता संजय नेमाडे यांनी दिली आहे.

Water Supply 1 jpg webp

जळगाव लाईव्हशी बोलताना अभियंता संजय नेमाडे म्हणाले की, जळगाव शहरामध्ये उद्यापासून पाणीपुरवठा होणार आहे. गुरुवारी होणारा पाणीपुरवठा हा रविवारी होणार आहे. शुक्रवारी होणारा पाणीपुरवठा हा सोमवारी होणार आहे. तसेच शनिवारी होणारा पाणीपुरवठा हा मंगळवारी होणार आहे. याबाबत नागरिकांनी दक्षता घेणे अतिशय गरजेचे आहे असे यावेळी संजय नेमाडे म्हणाले.

वाघुर पंपिंग स्टेशनचा विद्युत पुरवठा गेल्या ४८ तासांपेक्षा जास्त कालावधीपासून बंद झाल्यामुळे पाणीपुरवठा करण्यासाठी अडथळा येत आहे. वाघूर राॅ-वाॅटर पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता खंडीत झाला हाेता. गुरूवारी सायंकाळपर्यंत २२ किमी लांबीची विद्युत लाइन तपासणी केल्यानंतर कुसुंबा गावाजवळील नाल्यात अंडरग्राउंड केबलमध्ये तीन ठिकाणी खंड पडल्याचे उघडकीस आले. शुक्रवारी सकाळपासून केबल जाेडणीचे काम सुरू हाेते; परंतु नाल्याला पावसामुळे पूर आल्याने सातत्याने कामात व्यत्यय येत हाेता. रात्री १२ वाजेपर्यंत दुरूस्ती पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळे शनिवारी शहरातील पाणीपुरवठा झाला नाही, असे नेमाडे म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now