नागरिकांनो, सावधान : अनोळखी लिंकला क्लिक करू नका, जामनेरच्या तरुणाला ‘इतक्या’ हजारांचा गंडा!

सप्टेंबर 16, 2022 3:46 PM

Jamner News- जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२२ । जामनेर येथील २८ वर्षीय तरुणाला अनोळखी लिंकवर क्लिक करताच 39 हजारांचा आर्थिक फटका बसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसात अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 06 14T142958.323 jpg webp

शेख सुफीयाना शेख कलिम (28, रा.जामनेर पुरा) यांच्या मोबाईलवर मंगळवार, 13 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास 7381708207 या मोबाईलवरून एक एस.एम.एस.आला. एसएमएसमधील लिंकवर क्लिक करताच त्यांच्या क्रेडीट कार्डमधून 39 हजार रुपये कपात झालेत. याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेख सुफीयाना यांनी 7381708207 या मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास हवालदार विनोद पाटील हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now