जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र तथा संयुक्त राष्ट्रसंघातील स्थाय समितीतले भारताचे प्रथम सचिव पवन बढे यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. त्यांच हे भाषण सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. (pawan bade)
जळगाव जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणारे पवन बढे हे भारतीय विदेश सेवेत अर्थात इंडियन फॉरीन सर्व्हीसमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत.संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत त्यांनी पाकिस्तान तसेच इस्लामी राष्ट्रांच्या संघटनेच्या दुटप्पी भूमिकेवरून जोरदार टीका केली. ते म्हणाले की,इस्लामी राष्ट्रांच्या संघटनेने पाकिस्तानला वेसण घातलेले नाही. यामुळे हा देश भारत विरोधी प्रोपगंडा राबवित आहे. पाकिस्ताने जम्मू-काश्मिरातील मानव अधिकारांबाबत चिंता करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. कारण पाकचेच मानवाधिकाराबाबतचे रेकॉर्ड हे अतिशय खराब आहेत.
https://youtu.be/o2bfGFlUHTY
या देशातील अल्पसंख्यांकांवर अनन्वीत अत्याचार होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधून घेतले. या देशात हिंदू, शिख, ख्रिस्ती आदी धर्मियांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असतात. यासोबत पाकिस्तानमधील मानवाधिकार कार्यकर्ते, उदारमतवादी विचारवंत, विद्यार्थी नेते आदींचीही छळवणूक होत असते. असे असतांना भारता विरूध्द गरळ ओकणे हेच त्यांचे एकमेव कार्य आहे.दरम्यान, पवन बढे यांच्या भाषणाला सोशल मीडियातून व्यापक प्रतिध्दी मिळाली असून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
याआधी विविध देशांमध्ये यशस्वी सेवा बजावल्यानंतर ते स्वित्झर्लंडची राजधानी असलेल्या जिनेव्हातील संयुक्त राष्ट्र संघातील (युनायटेड नेशन्स) स्थायी समितीत भारताचे प्रथम सचिव म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.