राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचे महापौरांकडून स्वागत

सप्टेंबर 15, 2022 7:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्ष नेते आ.अजित पवार गुरुवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आलेले आहेत. सायंकाळी ते जळगाव शहरात आले असता महापौर जयश्री महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

jalgaon 15

जनसंवाद यात्रा आणि पक्षाच्या बैठकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार गुरुवारी जळगावात आले होते. चाळीसगाव, पाचोरा येथे विविध कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर ते जळगावात आले होते. जळगावात आगमन झाल्यावर महापौर जयश्री महाजन यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रसंगी ऍड.रवींद्र पाटील, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now