जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । जागतिक बाजारातून मिळालेल्या संमिश्र संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारात तेजी पाहायला मिळतेय. आज सकाळी व्यवहाराच्या सुरुवातीलाच शेअर बाजार (Share Market) वधारला आहे. आज झालेल्या वाढीनेनंतर निफ्टी (Nifti) पुन्हा 18 हजारांवर गेली आहे. 4 एप्रिलनंतर निफ्टीही प्रथमच 18 हजारांच्या वर गेला. सोबतच सेन्सेक्सही (BSE Sensex) वधारलेला आहे. Share Market Update Today
भारतीय शेअर बाजार आज पुन्हा तेजीच्या मार्गावर परतण्यासाठी हतबल दिसत आहे. जागतिक बाजारातून मिळालेल्या मजबूत संकेतांचा परिणाम आज देशांतर्गत बाजारावर दिसून येत आहे. आज सकाळची शेअर बाजार सुरु होताच निफ्टी 50 रुपयांनी तर सेन्सेक्स 114 रुपयांनी वाढलेली दिसून आली. त्यामुळे 50 अंकांच्या वाढीसह निफ्टी 18,043 रुपयाच्या पातळीवर गेला आहे. तर सेन्सेक्स 114 अंकांच्या वाढीसह 60,461 रुपयाच्या पातळीवर गेला आहे.
गेल्या सत्रातच बाजार मोठ्या घसरणीतून सावरला होता आणि आज पुन्हा खरेदीचे वातावरण पाहायला मिळू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. यावेळी, गुंतवणूकदारांचा उत्साह कायम आहे, ज्यामुळे सेन्सेक्स-निफ्टी आज नवीन उंची गाठू शकतात.
यूएस आणि युरोपियन बाजार
अमेरिकन शेअर बाजारात एक दिवस आधी झालेली मोठी घसरण दुसऱ्या सत्रातच भरून निघाली. महागाईच्या आकड्यांमुळे घाबरलेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी अमेरिकन बाजारात विक्री करून नफा बुक केला, ज्यामुळे वॉल स्ट्रीटवर दोन वर्षांची मोठी घसरण दिसून आली, परंतु बुधवारच्या व्यवहारात गुंतवणूकदार पुन्हा खरेदीकडे परतले. गेल्या सत्रात अमेरिकेतील प्रमुख शेअर बाजारांमध्ये समाविष्ट असलेल्या नॅसडॅकमध्ये 0.74 टक्क्यांची वाढ दिसून आली.