पुढील चार दिवस उत्तर महाराष्ट्रात मुसळधार

सप्टेंबर 8, 2022 7:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२२ । पुढील चार-पाच दिवस हवामान विभागाने राज्यात विशेषतः कोकण पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते. त्या संदर्भामध्ये संबंधित जिल्हा प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी व कुठलीही आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहावे असे अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

कालही ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याची घटना घडली. महाराष्ट्रासह दक्षिण दक्षिणेकडील राज्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आपल्याकडे देखील एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांना सज्ज ठेवावे व यंत्रणांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1567133843806916608?s=20&t=L_1D5UiK8czLotc6Kyz3Jw

दुपारी हवामान विभागाने राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जळगावसह धुळे, नंदुरबार, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना वगळता सर्वत्र पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात दिवसभर उन्हाचा चटका बसत आहे. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक भागात पावसाच्या सरी कोसळत असल्याने काहीसा गारवा मिळत आहे. 



rain jpg webp

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now