जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून रेडींग रूम वाढत आहेत. यामुळे जळगाव शहरातील विद्यार्थ्यांमध्ये नवा जोश पाहिला मिळत आहे. जळगाव शहरात वाढत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि इतर गोष्टी लक्षात घेता जळगाव शहरांमध्ये रीडिंग रूम वाढत आहे

लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आपापल्या घरी परत गेले होते. विद्यार्थी संख्येमध्ये घट झाल्याने जळगाव शहरातील काही रूम बंद पडल्या होत्या. मात्र विद्यार्थ्यांमध्ये आता पुन्हा वाढ होऊ लागली आहे लॉकडाऊन चे दोन वर्ष आता निघून गेल्यामुळे विद्यार्थीही मोठ्या प्रमाणावर जळगाव येथे अभ्यासासाठी येत आहेत. त्याचा फायदा घेत जळगाव शहरांमध्ये रीडिंग रूम वाढले आहेत. जळगाव शहरामध्ये तब्बल 80 रिडींग रूम आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजेच गेल्या दोन वर्षात ह्या रिडींग रूम तब्बल वीस ने घटल्या होत्या. म्हणजेच साठ वर आल्या होत्या.

जळगाव शहरात विविध जिल्ह्यांमधून विद्यार्थी भरती परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी येत असतात. सरकारी नोकरी मिळावी या अशाने विद्यार्थी जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर अभ्यास करत असतात. यासाठी विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर जळगाव शहरात रीडिंग रूम उपलब्ध आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जळगाव शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रेडींग रूम उपलब्ध झाल्या आहेत. यंदा जवळपास 80 रीडिंग रूम जळगाव शहरांमध्ये आहेत. आम्ही जळगाव शहरांमध्ये अभ्यास करायला नंदुरबार जिल्ह्यामध्ये आलो आहोत. वाढत असलेल्या रेडींग रूम मध्ये आम्हाला अभ्यास करायची संधी मिळते यामुळे आमचा अभ्यास चांगला होतो.
राहुल राजपूत, विद्यार्थी
यंदा आमच्या रेडींग रूम मध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. म्हणून आम्ही रीडींग रूम मध्ये बाकडे देखील वाढवले आहेत. रीडिंग रूम मध्ये बाकडे वाढवल्याने विद्यार्थ्यांनी संख्या वाढली आहे. यामुळे एक रीडिंग रूमचा मालक म्हणून याचा मला स्वतःला अभिमान आणि आनंद दोन्ही होत आहे.
प्रीतम पवार, रिडिंग रूम मालक











