जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२२ । रोटरी जळगांव राॅयल्स, रोटरी जळगांव स्टार्स व सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सार्वजनिक गणेशोत्सव: नवी आव्हानं नवी जबाबदारी’ या विषयांवर परिसंवाद कार्यक्रम आज मंगळवार, दि. ०६ सप्टेंबर २०२२ रोजी दु ४:३० वा. रोटरी हाॅल, माया देवी नगर, महाबळ रोड, जळगांंव. येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी पंचावर विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. या परिसंवादास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

रोटरी जळगांव राॅयल्स व रोटरी जळगांव स्टार्स ने अनेक चांगले सामाजिक उपक्रम राबविलेत. तसेच गेल्यां २७ वर्षांपासुन सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे सुरू असलेले कार्य आपणास माहितीच आहे. यंदा दोन वर्षाच्या कालावधी नंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे, तो साजरा करताना सामाजिक भान लक्षात घेऊन साजरा करणे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. या अनुशंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. या व्यासपीठावरून आयोजित समाजमनातील जिव्हाळ्याच्या उत्सवाबद्दलची चर्चा. सार्वजनिक गणेशोत्सवाची गेल्या शतकभरातील वाटचाल, त्याचं बदललेलं स्वरूप, नव्या काळातील नवी आव्हाने आणि ती पार पाडण्यासाठीची सामाजिक व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची जबाबदारी या विषयीचा सर्वांगीण उहापोह होईल.

यावेळी मंचावर सर्वश्री अभीजित राऊत, जिल्हाधिकारी, डॉ प्रवीण मुंढे, पोलीस अधिक्षक, डॉ. विद्या गायकवाड़, आयुक्त महानगर पालिका, दिलीप गांधी, सहप्रांतपाल, रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०, प्रा. डॉ शमा सुबोध, सदस्य, रंगभूमि प्रयोग परिक्षण मंडळ, महाराष्ट्र, ज्ञानेश्वर बढे, जळगांव रनर्स गृप, सचिन नारळे, अध्यक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, विजय लाठी, अध्यक्ष, रोटरी जळगांव राॅयल्स, सागर मुंदड़ा, माजी अध्यक्ष रोटरी जळगांव स्टार्स. हे उपस्थित राहणार आहेत.











