विद्यापीठात नियमीत बस सेवा सुरू करण्याची मागणी

सप्टेंबर 6, 2022 11:20 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२२ । क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ करीता नियमीत बसेस सुरू करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

jalgaon 44

आगार प्रमुख यांना सदर निवेदन देण्यात आले आहे. सकाळी 9 ते दुपारी 2 वाजता व दूपारी 5 वाजेला विद्यार्थी हित लक्षात घेवून बस सुरू करावी, तसेच धुळे व नंदुरबार येथून विद्यापीठ करता येणारे विद्यार्थी यांना विद्यापीठ थांबा न देता आपल्या बसेस सरळ निघून जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी आपण त्वरीत बस सुरू करून विद्यापीठ साठी थांबा मिळावा. अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच बससेवा सुरु न झाल्यास आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी गौरव वाणी ( रावेर लोकसभा अध्यक्ष विद्यार्थी ), रोहन सोनवणे (प्रदेश सरचिटणीस),कुणाल पवार (जिल्हा अध्यक्ष),गणेश निंबाळकर, जीवन जगताप,रुपेश सुर्यवंशी, प्रसाद पाटील, मयूर जैन आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now