येथेही फोडाफोडीची भाषा? गुलाबराव पाटलांनी दिला शिक्षकांना भलताच सल्ला; पहा काय म्हणाले?

सप्टेंबर 5, 2022 6:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२२ । जळगाव जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला यावेळी शिंदे गटाचे सदस्य तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रमुख अथिती म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यादरम्यान, आपले मनोगत व्यक्त करताना गुलाबराव पाटील विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांना भलताच सल्ला देऊन बसलेत. त्यामुळे त्यांच्या त्या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

gulabrao patil 1 jpg webp

नेमकं काय म्हणले..
गुलाबराव पाटील यांनी देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांसमोरच फोडाफोडीची भाषा केली आहे. मराठी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या वाढवायची असेल तर ज्याप्रमाणे पक्षाचे लोक फोडले जातात, तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे विद्यार्थी फोडा, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

ऐवढ्यावरच गुलाबराव पाटील थांबले नाहीत तर त्यांनी भ्रष्टाचाराबाबतही एक धक्कादायक विधान केले. आज काल कोण करप्ट नाही, आजची सगळी दुनिया करप्ट आहे, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. या देशात एकमेव नॉन करप्ट प्राणी म्हणजे शिक्षक असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी शिक्षकांचा उदो उदो देखील केला. मंत्री गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now