वासुदेव जोशी तरुण मित्र मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबीर, ३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

सप्टेंबर 4, 2022 4:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२२ । वासुदेव जोशी समाज सेवा संघ संचलित वासुदेव जोशी तरुण मित्र मंडळातर्फे आज रविवारी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला नागरीकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी सुमारे ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

jalgaon 2022 09 04T164359.800 jpg webp

वासुदेव जोशी समाज सेवा संघ संचलित वासुदेव जोशी तरुण मित्र मंडळातर्फे शहरातील वासुदेव जुनी जोशी कॉलणी, शहीद हेमू कलाणी उद्याना जवळ पाण्याच्या टाकी जवळ या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वासुदेव जोशी समाज सेवा संघ संचलित वासुदेव जोशी तरुण मित्र मंडळाचे हे ५२ वे वर्ष होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुनील भंगाळे, आनंदा फकिरा जोशी, सदाशिव नाना शिंदे, किरण मोरकर, प्रकाश बालानी, रविंद्र सोनवणे, मनोज आहुजा,सुशिल हासवानी,इश्वर गोंडे,आरुण झोटूंगे,हरीश भोजने,हरीश भोजने,अनिल जोशी,विनोद बोरसे,विनोद भोपे,राम जोशी,ललित आहिरराव,चेतन जोशी,गणेश भोजने,उमेश जोशी,रोहित जोशी,अनूप जोशी,किशोर जोशी,अशोक मोरकर,दीपक जोशी व सागर जोशी आदी उपस्थित होते.


Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now