मनपाच्या मानाच्या श्रीगणेशाची महाजन दाम्पत्याच्याहस्ते प्रतिष्ठापना

ऑगस्ट 31, 2022 7:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२२ । शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवांतर्गत मानाचा मानल्या जाणार्‍या जळगाव शहर महानगरपालिकेच्या ‘श्रीगणेशा’ची आज बुधवार, दि.31 ऑगस्ट 2022 रोजी जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात जळगाव शहराच्या प्रथम नागरिक व महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका व जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका जयश्री सुनिल महाजन व महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनिल महाजन या दाम्पत्याच्या शुभहस्ते विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.

mahapalika jalgaon ganpati jpg webp

याप्रसंगी महापालिकेच्या आयुक्त डॉ.सौ.विद्या गायकवाड, अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी, लेखा अधिकारी चंद्रकांत वानखेडे, नगरसचिव सुनील गोराणे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, प्रभाग अधिकारी, विविध समित्यांचे सभापती तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांसह उपस्थितांनी सर्वत्र सुख-समृद्धी नांदण्यासह जळगावकरांचे आरोग्य निरामय राहून शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी श्रीगणेशाचरणी प्रार्थना करून ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’ असा जयघोष केला. महापौरपदी विराजमान झाल्यानंतर सलग दुसर्‍यावर्षी जयश्री सुनिल महाजन यांनी महापालिकेच्या मानाच्या ‘श्रीगणेशा’ची विधिवत प्रतिष्ठापना केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now