कौतुकास्पद : आईच्या दशक्रिया कार्याला केले रोपांचे वाटप

ऑगस्ट 18, 2022 12:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२२ । येथील समर्थ कॉलनीतील स्व.सौ.श्वेता वाणी-नेवे फाऊंडेशनचे अध्यक्ष मिलिन्द नेवेवाणी यांच्या मातोश्री गं.भा.शालिनी मनोहर नेवे-वाणी यांचा उत्तरकार्य विधी कुटुंबीयांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने पार पाडला. दशक्रिया विधी सोपस्कार पार पडल्यावर ध्वजारोहण करून समाजबांधवांना रोपांचे वाटप करण्यात आले.

vani 1 jpg webp

गं.भा.शालिनी नेवे यांचे उत्तरकार्य आणि भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनी हर घर तिरंगा कार्यक्रमाअंतर्गत सर्व समाज बांधवासोबत ध्वजवंदन करण्यात आले. सोबतच परंपरागत चालीरितींना आळा घालून गंधमुक्ती कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व महिला-बांधव व पितरांना विविध प्रकारची रोपे वाटप करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष रोहन नेवे, सचिव शिखा वाणी, सदस्य प्रतिमा वाणी, राजश्री नेवे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अजिका नेवे, आदित्य वाणी, अभिषेक वाणी, रेणुका नेवे, प्राजक्ता नेवे, चंद्रकांत वाणी व सर्व समाज बांधव यांचे सहकार्य लाभले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now