भुसावळला अभाविप व भारतीय शाकाहार संघातर्फे विविध कार्यक्रम!
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२२ । भुसावळ शहरात अ.भा.विद्यार्थी परिषद व भारतीय शाकाहार संघ यांच्या संयुत विद्यमाने स्वतंत्र दिवसाच्या अमृत महोत्सवी विविध कार्यक्रम करण्यात आले. यात सर्व स्मारकांवर तिरंगा ध्वज लावण्यात आले, तसेच ध्वज वाटप, वृक्ष वाटप व ७५लिटर चहा वाटण्यात आला. यावेळी ABVP जिल्हा संघटक प्रसाद, भारतीय शाकाहार संघाचे जिल्हाध्यक्ष चेतन जैन, गौसेवा परिवार तर्फे रोहित महाले, विशाल ठाकूर वीरेंद्र तुरकेले, प्रवीण पाटील, हर्षल पाटील, लोकेंद्र बगले, तुषार जाधव उपस्थित होते.
तिरंगा रॅलीच्या आयोजकांकडून व सर्व देश प्रेमी बांधवांकडून शहरातील नाहटा चौक स्थित शहीद स्मारक येथे देशप्रेम आणि देशभक्ती च्या घोषणा देण्यात आल्या. भारत मातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले. यापुढेही देशभक्ती व देश स्वाभिमानासाठी असलेले कोणतेही कार्य करण्याकरिता व कार्यक्रम राबवण्या करिता सर्व देशप्रेमी बांधवांनी व शहरातील तमाम नागरिकांनी याचप्रमाणे एकत्र यावे, आपले अनमोल सहकार्य द्यावे, असे मनोगत आयोजकांकडून व्यक्त करण्यात आले.