खळबळजनक : महिलेचा घरात आढळला मृतदेह!

ऑगस्ट 17, 2022 4:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२२ । शहरातील संभाजी नगरात ५४ वर्षीय महिलेचा घरात मृतदेह आढळला आला आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime 5 jpg webp

लिलाबाई यादव इंगळे (वय ५४, रा. संभाजी नगर, जळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. लिलाबाई इंगळे या संभाजी नगरात वास्तव्याला असून त्या भुसावळ येथे नोकरीला होत्या. त्या अविवाहित असून संभाजी नगरात एकट्याच राहत होत्या. मंगळवारी दि. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घरात लिलाबाई इंगळे याचा मृतदेह मयतस्थितीत आढळून आला. शेजारी राहणाऱ्या नागरीकांना दुर्गंधी आल्याचे हा प्रकार उघडकीला आला.

दरम्यान, रामानंदनगर पोलीसांना कळविल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला आहे. दोन – तीन दिवसांपुर्वी त्याचा मृत्यू झाला आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी सांगितले. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी १७ ऑगस्ट रोजी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now