महाराष्ट्रराजकारण

ईश्वराला साक्षी ठेवून शपथ घेतो.. या भावी 18 मंत्र्यांनी घेतली गोपनियतेची शपथ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२२ । गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर आज मुहूर्त मिळाला. शिंदे-भाजप सरकारच्या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आज मंगळवारी सकाळी 11 वाजता राजभवन पार पडला. यावेळी भावी 18 मंत्र्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गोपनियतेची शपथ दिली. त्यामुळे राज्याला अखेर कारभारी मिळाले आहेत. Maharashtra Cabinet Expansion 2022

राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसल्यांनंतर शिंदे आणि भाजपचे सरकार स्थापन झाले होते. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र 40 दिवस होऊनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नव्हता. यावरून विरोधकांकडून जोरदार निशाणा साधला जात होता. अखेर आज (9 ऑगस्ट) मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. आज 11 वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात शिंदे गटाकडून ९ तर भाजप गटाकडून ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

यात शिंदे गटाकडून दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, उदय सामंत, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, दादा भुसे, शंभुराज देसाई, तानाजी सावंत आणि संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखेपाटील, सुरेश खाडे, विजयकुमार गावित, अतुल सावे आणि रवींद्र चव्हाण यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

अपक्षांना संधी नाही

आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात अपक्षांना स्थान देण्यात आलेलं नाही. शिंदे गटाने एकाही अपक्ष आमदाराला मंत्रिपद दिलं नाही. पुढील विस्तारात या अपक्षांना मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. त्यामुळे बच्चू कडू यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button