एरंडोलात नगरपरिषदेने फिरविले अतिक्रमणवर बुलडोझर…

ऑगस्ट 9, 2022 11:45 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२२ । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत एरंडोल शहरातील मुख्य रस्त्याचे ( मेन रोड, मारवाडी गल्ली ) येथील गटारी वरील पायऱ्या, ओटे व तत्सम इ प्रकारचे अतिक्रमण बांधकाम काढण्याची मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिमेसाठी नगर पालिका चे मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून मोहिम यशस्वीपणे राबविली. दरम्यान, नागरिकांनी अतिक्रमण करु नये, अतिक्रमण केले तर योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी सांगितले.

कार्यवाही चे शहर वासियांनी स्वागत केले. कार्यवाही चे अगोदर पन्नास टक्के लोकांना अतिक्रमण काढून टाकले होते. यावेळी अतिक्रमण विभाग प्रमुख देवेंद्र शिंदे, कार्यालिन अधिक्षक हितेश जोगी, दिपक गोसावी, आनंद दाभाडे, विकास पंचबुध्धे, योगेश सुकटे, अजित भट्ट, अनिल महाजन, अशोक मोरे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

jalgaon 16

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now